चला हवा येऊ द्याच्या मंचावर शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा करणार जब हॅरी मेट सेजलचे प्रमोशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 16:47 IST
जब हॅरी मेट सेजल या शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची ...
चला हवा येऊ द्याच्या मंचावर शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा करणार जब हॅरी मेट सेजलचे प्रमोशन
जब हॅरी मेट सेजल या शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी सध्या शाहरुख आणि अनुष्का सोडत नाहीयेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते दोघे अनेक रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावत आहेत. आता या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक मराठमोळ्या कार्यक्रमात शाहरुख आणि अनुष्का येणार आहेत.शाहरुख खान चला हवा येऊ द्याच्या मंचावर जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. त्याने याआधी फॅन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली होती. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शाहरुख चला हवा येऊ द्याच्या सेटवर उपस्थित राहिला होता. त्यावेळी या कार्यक्रमाच्या सेटवर त्याचे अगदी मराठमोळ्या पद्धतीने फेटा बांधून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले होते. याशिवाय त्याच्या हस्ते गुढीही उभारण्यात आली होती. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, भरत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे यांनी त्यावेळी शाहरुखसोबत खूप मजा-मस्ती केली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना हीच मजा-मस्ती अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी शाहरुख आणि अनुष्काने चित्रीकरण केले असून प्रेक्षकांना हा भाग लवकरच पाहायला मिळणार आहे.जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि या चित्रपटाच्या गाण्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. अनुष्का आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना याआधीदेखील रब ने बना दी जोडी, जब तक है जान यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. अनुष्का आणि शाहरुखची सुपरहिट जोडी या चित्रपटाद्वारे पुन्हा एकत्र येत असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाकडून चांगल्याच अपेक्षा आहेत आणि विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली करत आहेत. Also Read : करिना कपूरने शाहरुख खानसोबत काम करण्यास दिला नकार?