Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘तुम्हाला लाज कशी वाटली नाही ?’;शोमध्ये बोलवून शगुफ्ता अलींना आर्थिक मदत केल्यामुळे नेटक-यांचा राग अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 20:38 IST

शगुफ्ता यांच्यावर ओढावलेली परिस्थितीमुळे माधुरी दिक्षितने त्यांना आर्थिक मदत म्हणून शोच्या वतीने ५ लाख रु. मदत म्हणून देण्यात आली होती.पण शगुफ्ता यांना ‘ऑन कॅमेरा’ मदत चाहत्यांना काही रूचली नाही.

अभिनेत्री शगुफ्ता अलीने 15 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलंय. 20 पेक्षा जास्त लोकप्रिय मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका वठवल्या आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी शगुफ्ताने कामास सुरूवात केली होती. आज शगुफ्ता यांचे वय 54 वर्ष आहे. पण कोरोना काळात काम नाही, पैसे नाहीत, अशा अवस्थेत घरातील सामान विकत गुजराण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शगुफ्ता अली त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे चर्चेत आहेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगताच अनेकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. यात रोहित शेट्टीनेही त्यांना आर्थिक मदत केल्याचे समोर आले होते. शगुफ्ता यांची आपबीती ऐकून त्यांना ‘डान्स दिवाने ३’ शोमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

या शोदरम्यान शगुफ्ता यांनी पुन्हा त्यांच्या बिकट परिस्थितीविषयी सांगताच सा-यांच्याच डोळ्या पाणी आले. शगुफ्ता यांच्यावर ओढावलेली परिस्थितीमुळे माधुरी दिक्षितने त्यांना आर्थिक मदत म्हणून शोच्या वतीने ५ लाख रु. मदत म्हणून देण्यात आली होती.पण शगुफ्ता यांना ‘ऑन कॅमेरा’ मदत चाहत्यांना काही  रूचली नाही. लोकांनी यावरून शोला जबरदस्त ट्रोल केले आहे. टीआरपीसाठी तुम्ही आणखी किती खालची पातळी गाठणार? असा संतप्त सवाल युजर्सनी केला आहे. टीआरपीसाठी मेकर्सनी गरजुंचा वापर केल्याचा आरोप अनेक नेटक-यांनी केला आहे.

सोशल मीडियावर या शोचे फोटो समोर येताच नेटीझन्सचा मात्र संताप झाला. शगुफ्ता यांना शोमध्ये बोलावून नॅशनल टीव्हीवर त्यांना मदत दिल्याची सांगायची गरजच नव्हती, प्रत्येक गोष्ट दिखावा करत सांगायची गरजच काय असे नेटीझन्स कमेंट करत आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांना मदतच करायची होती तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकले असते. आर्थिक मदत करुन काय होईल, त्यापेक्षा त्यांना काम द्या. इतक्या मालिका सुरु आहेत. त्यांना एकाही मालिकेची ऑफर मिळू नये अशा कमेंट करत नेटीझन्स चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

टॅग्स :माधुरी दिक्षित