Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' क्रिकेटरवर होते नेहा क्करचे क्रश..जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 10:48 IST

गायिका नेहा कक्कर तिच्या आवाजाने प्रेक्षकांना मोहित केले आहे आणि कलर्सच्या एंटरटेनमेंट की रात या कार्यक्रमाच्या  विशेष  भागात भाऊ-बहिणींच्या ...

गायिका नेहा कक्कर तिच्या आवाजाने प्रेक्षकांना मोहित केले आहे आणि कलर्सच्या एंटरटेनमेंट की रात या कार्यक्रमाच्या  विशेष  भागात भाऊ-बहिणींच्या जोड्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.. यात नेहा आपला भाऊ सोनू कक्कर सोबत दिसणार आहे. तसेच क्रिकेटर इरफान पठाण आणि युसूफ पठाण या भावांची जोडी ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या भाऊ-बहिणींच्या दोन्ही जोड्या आरजे मलिश्कासोबत गेम खेळताना दिसणार आहेत. पुढे काय होणार आहे याचा काही विचार? या टास्कच्या दरम्यान, सोनू कक्कर आपली बहिण नेहा कक्करच्या क्रशचे गुपित उघड करणार आहे. नेहाचे क्रेश दुसरा तिसरा कुणी नसून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटने नुकतेच अनुष्का शर्माशी लग्न करुन लाखो तरुणांचे ह्रदय तोडले आहे. इटलीमध्ये जाऊन विराटने आणि अनुष्काने गपचुप विवाह केला. सध्या ते आपला हनीमून एन्जॉय करतायेत. नेहाने आपल्या करिअरची सुरुवात ही एका रिऑलिटी शोव्दारे स्पर्धक म्हणून केली होती तर काही दिवसांपूर्वी ती सारेगमपा या रिऑलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. एका मुलाखती नेहा म्हणाली होती. मी एका रिअॅलिटी शोद्वारे आल्यामुळे माझ्यासाठी रिअॅलिटी शो हे खूप जवळचे आहे. मला कोणत्या तरी रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारायला मिळावी अशी माझी नेहमीच इच्छा होती. सारेगमपा लिटिल चॅम्पस या कार्यक्रमामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. तसेच ती पुढे म्हणाली,  तुम्ही एक चांगले गायक असता, त्यावेळी तुम्हाला सगळ्या तांत्रिक गोष्टी चांगल्याप्रकारे माहीत असतात. त्यामुळे परीक्षण करणे कठीण जात नाही. पण लहान मुलांच्या गायनाचे परीक्षण करणे हे तितकेसे सोपे नसते.  एखाद्या छोट्याशा गावातून येता, त्यावेळी कोणत्याही मोठ्या संगीतकाराला जाऊन भेटणे, त्याच्यासमोर तुमची कला सादर करणे हे तुमच्यासाठी खूप कठीण असते. पण रिअॅलिटी शोमुळे अनेक दिग्गज तुम्हाला ऐकतात, त्यांना भेटण्याची संधी तुम्हाला मिळते, त्यामुळे तुमच्यासाठी इंडस्ट्रीचे दरवाजे खुले होतात. मी तर 16व्या वर्षी इंडियन आयडलचा भाग झाले होते. या कार्यक्रमाने मला खूप काही मिळवून दिले.