Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोटी सरदारनी शोने 300 एपिसोडचा टप्पा केला पूर्ण, दणक्यात केले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 16:54 IST

छोटी सरदारनी शोमधील त्यांची गोड नोकझोकीचे कौतुक केले जात आहे. लाखो लोकांची मने जिंकणारा या शोने आता यशस्वी 300 एपिसोड पूर्ण केले आहेत.

छोटी सरदारनी शो प्रेक्षकांचे यशस्वीरीत्या मनोरंजन करत आहे, मेहेर (निम्रत कौर अहलुवालिया) आणि सरबजित (अविनेश रेखी) यांच्या रंजक कथेद्वारे प्रेक्षकांचेही भरघोस मनोरंजन होत आहे. शोमधील त्यांची गोड नोकझोकीचे कौतुक केले जात आहे. लाखो लोकांची मने जिंकणारा या शोने आता यशस्वी 300 एपिसोड पूर्ण केले आहेत. शोच्या सर्व कलाकारांनी हा विशेष टप्पा इतर कर्मचाऱ्यांसोबत केक कापून साजरा केला.  

निम्रत म्हणाली, “मी आमच्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानते त्यांनी केलेल्या मनापासूनच्या प्रेम व कौतुकासाठी. त्यांचे प्रेम आणि आशिर्वादामुळे आम्ही हा नवा टप्पा गाठू शकलो आहोत. सर्वांचे आभार मानण्याची संधी मी घेत आहे आणि छान काम करून त्यांचे मनोरंजन करण्याचे वचन त्यांना देत आहे.

यातच पुढे अविनेश म्हणाला, “हा एक उल्लेखनीय प्रवास राहिला आहे आणि मी त्यातील प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेतला आहे. आता आम्ही एक नवीन टप्पा गाठला आहे, तर माझी इच्छा आहे अशा प्रकारचे अनेक क्षण साजरे करण्यासाठी येवोत आणि प्रेक्षक आमच्यावर प्रेमाचा व कौतुकाचा असाच वर्षाव करोत.”  

भारावून गेलेला हितेश म्हणाला, “शो मध्ये मी एकदा नाही तर दोनदा सहभागी झालो आहे म्हणून मी स्वतःला नशीबवान समजतो. प्रत्येक वेळी मला मिळालेले प्रेम व प्रतिसाद अतुलनीय आहे. आता आम्ही जीवनातील छोटा आनंद साजरा करत असताना, संपूर्ण कलाकार व शोचे कलाकार यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो.”