Join us

'३६ गुणी जोडी' मालिकेत नवा ट्विस्ट, वेदांतसमोर येणार आरती आणि विक्रांतचं सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 17:53 IST

'३६ गुणी जोडी' ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

३६ गुणी जोडी' ही एकमेकांपासून विरुद्ध असणाऱ्या दोन व्यक्तींची कथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ह्या मालिकेची टॅग लाईनच आहे ‘प्रत्येक जोडी जुळत नसते’. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.

आता पर्यंतच्या भागात आपण पाहिलं की, प्रेमात असलेला विक्रांत पहिल्यांदा आरती बद्दल आद्याशी बोलतो आणि सांगतो की मला फक्त तिच्याशी लग्न करायचे आहे. आणि तेव्हाच गौतमच्या वडिलांचा फोन अण्णांना येतो आणि साखरपुडा तीन दिवसात करू या असा प्रस्ताव ते मांडतात. तर दुसरीकडे सारिका राजसिंग सुमतीला आरतीच्या साखरपुडयाची बातमी समजते.

सारिका खुश होते. आरतीच्या प्रेमात वेडा झालेला विक्रांत दारू प्यायला फार्महाऊस वर जातो तिथे सारिका त्याला सांगते की आरतीचा साखरपुडा ठरला आहे आणि आता तिचं लग्न होणार,आत्ता ती कायमची दुसऱ्याची होणार ह्या कल्पनेनेच  विक्रांत त्रासून वेदांतला फोन करून आपली जगण्याची आपली इच्छा नसल्याचं सांगतो आणि त्याचवेळेस विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करतो. आता आरती गौतमशी लग्न करण्यास नकार देईल? आणि विक्रांतला स्वीकारेल का? गौतमचा खरा चेहरा आरतीसमोर येईल का? हे पाहणे रोमांचक असणार आहे.   

टॅग्स :झी मराठी