Join us

अयुबसोबत केमिस्ट्री जमली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 14:38 IST

अभिनेता अयुब खान शक्ती... अस्तित्व के एहसास की या आगामी मालिकेत दोन मुलीच्या पित्याची भूमिका साकारत आहे. एकाच घरातील ...

अभिनेता अयुब खान शक्ती... अस्तित्व के एहसास की या आगामी मालिकेत दोन मुलीच्या पित्याची भूमिका साकारत आहे. एकाच घरातील दोन मुलींना कशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने वागवले जाते हे या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील कथानकानुसार अयुबच्या दोन मुलींमधील एकच मुलगी त्याची लाडकी आहे असे दाखवण्यात आले आहे. पण खऱ्या आयुष्यात या दोन्ही मुली अयुबच्या प्रचंड लाडक्या आहेत. चित्रीकरणाच्या दरम्यान जास्तीत जास्त वेळ तो दोघींसोबत घालवतो. यामुळे त्या दोघीही त्याच्यावर प्रचंड खूश आहेत.