Join us

Rajeev Sen: 'आमच्या मुलीपेक्षा..', चारू असोपासोबत झालेल्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलला राजीव सेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:08 IST

अलिकडेच राजीव सेन आणि अभिनेत्री चारू असोपा यांचा घटस्फोट झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी चारू असोपा आणि भाऊ राजीव सेन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहेत. अभिनेत्री चारू असोपा हिने काही दिवसांपूर्वी राजीव सेनसोबत घटस्फोट घेतला असून ती आपल्या आयुष्यात पुढे जात आहे. चारू केवळ अभिनेत्री नाही तर व्लॉगर देखील आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. राजीव पहिल्यांदाच आपल्या घटस्फोटावर बोलला आहे.

घटस्फोटानंतरच्या तिच्या आयुष्याविषयी बोलताना चारू म्हणाली, आणि घटस्फोट झाला. राजीव हा नेहमीच जियानाचा बाबा असेल. तो जियानाला वाटेल तेव्हा भेटू शकतो. चारू आणि राजीव यांचे २०१९ साली लग्न झाले. लग्नानंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाला. आता चारूनंतर राजीव आपल्या नात्याबद्दल बोलला आहे.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, राजीव म्हणाले, 'गोष्ट जेव्हा माझ्या मुलीची येते तेव्हा माझं प्रेम कधीच संपत नाही.  चारू आणि मी मित्र म्हणून राहू आणि आमच्या मुलीसाठी एकमेकांना आधार देऊ कारण आमच्या दोघांसाठी आमच्या मुलीपेक्षा महत्त्वाचे असे कहीही नाही. एक वडील म्हणून माझ्या मुलीला जास्तीत जास्त वेळ देणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि चारूलाही तेच हवे आहे. माझे प्रेम आणि पाठिंबा नेहमीच असेल.

घटस्फोटापूर्वी राजीव आणि चारू यांनी एकमेकांवर गंभीर आरोपही लावले होते. राजीवने सांगितले की चारूने तिचे पहिले लग्न त्याच्यापासून लपवले होते. तर चारूने सांगितले होते की, राजीव तिच्यावर अनेकदा संशय घेत असे. आता दोघांमधील कटुता संपली आहे. 

टॅग्स :सुश्मिता सेन