Join us

अक्षर कोठारीने दिली आदिवासी पाड्याला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2017 17:13 IST

चाहूल मालिकेतील सर्जेराव म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका अक्षर कोठारी सध्या मालिका, नाटक आणि सिनेमा मध्ये बराच व्यस्त होता.या सगळ्या धकाधकीच्या ...

चाहूल मालिकेतील सर्जेराव म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका अक्षर कोठारी सध्या मालिका, नाटक आणि सिनेमा मध्ये बराच व्यस्त होता.या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये कलाकारांना स्वत:साठी वेळ काढण खरंच खूप कठीण असतं. पण, हि संधी अक्षरला मिळाली. त्यामुळे अक्षरने थेट लोणावळ्याला जायचा प्लॉन केला. यावेळी अक्षरची पत्नी मानसी नाईक शूटिंगमध्ये बिझी असल्याने त्याने एकट्यानेच जाण्याचा निर्णय घेतला. अक्षरने लोणावळ्याला जाताना खोपोली जवळच्या आदिवासी पाड्याला भेट दिली. अक्षयने यावेळी आदिवासी पाड्यातील लोकांनासोबत छान वेळ घालवला. तसेच अक्षय त्यांच्याबरोबर जेवलासुद्धा. आदिवासी पाड्यातील लोकांनी सुद्धा आपल्या आवडत्या कलाकरासोबत फोटो काढले. आपल्या आवडत्या कलाकाराला बघून खूपच आनंद झाला.अक्षर म्हणाला, ''सध्या मी बऱ्याच कामांमध्ये व्यस्त आहे त्यामुळे मला स्वत:साठी वेळ काढणे जमत नाही. पण त्यादिवशी पॅकप लवकर झाले त्यामुळे मी लगेच निर्णय घेतला आणि बाहेर पडलो. मला मध्यंतरी स्लीप डिस्कचा त्रास झाला होता त्यामुळे मी गाडी चालवू शकत नव्हतो. पण, आता तो त्रास बराच कमी झाला आहे त्यामुळे मी एकटाच मस्त ड्रायव्ह करत गेलो. खूप मज्जा आली असे अक्षय म्हणाला. तसेच पण मी मानसी ला नक्कीच मिस केल्याचे त्यांनी म्हटले आहे.