Join us

चंगु- मंगू ऑनस्क्रिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 12:53 IST

छोट्या पडद्यावर हास्याचा ब्लास्ट होणार आहे. कारण एक शेर आहे तर दुसरा सव्वाशेर.एक नेहला असेल तर दुसरा आहे नेहले ...

छोट्या पडद्यावर हास्याचा ब्लास्ट होणार आहे. कारण एक शेर आहे तर दुसरा सव्वाशेर.एक नेहला असेल तर दुसरा आहे नेहले पे देहला. त्यांना पाहिलं की तुम्हाला चार्ली चॅप्लिन आणि लॉरेन अँड हार्डीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.एकमेंकांशिवाय जणू काही ते अपूर्ण आहेत.ते आहेत यारो के यार बॉलीवुडचे स्टार चंगू-मंगू अर्थात अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक-अभिनेता साजिद खान. खोड्या करणे,एकमेकांचे पाय खेचणे, हसता हसता फटके लगावणे यात दोघेही वस्ताद आहेत. साजिदने वन लाइनर बाऊन्सर टाकला की तितक्याच ताकदीने रितेशसुद्धा जोरदार बोलंदाजी करतो. या चंगू-मंगूने आजवर बॉलीवूडमध्ये विविध सिनेमात एकत्र काम केले आहे.त्यामुळे दोघांची ट्युनिंग अशी काही जमली की कुणीही त्यांच्यासमोर तोंड उघडण्याची हिंमतच करत नाही. आता हेच चंगू मंगू 'यारों की बारात' या रिअॅलिटी टॉक शोमध्ये भल्या भल्यांची बोलती बंद करत सिक्रेट बाहेर काढणार आहेत. त्यांचे बोलणेच नाही तर त्याचे सेटवर वावरणे, वागणे आणि स्टाईल सारे काही अफलातून आहे. आता हेच पाहा ना, शोच्या सेटवर जेव्हा हे चंगू मंगू अवतरले तेव्हा त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसिंगकडे पाहूनही तुम्हाला हसू आवरणार नाही. त्यामुळं चंगू-मंगू सोबत कॉमेडीचा ब्लास्ट एन्जॉय करण्यासाठी सज्ज व्हा.