Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामायण मालिकेत महामंत्री सुमंत यांची भूमिका साकारलेले अभिनेते चंद्रशेखर वैद्य रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 13:45 IST

चंद्रशेखर हे अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शक देखील आहेत. त्यांनी 110 हून अधिक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

ठळक मुद्देचंद्रशेखर यांचा जन्म 1923 ला झाला होता. त्यांनी काही वर्षं चौकीदार म्हणून काम केले होते. अभिनयाची आवड असल्याने ते या क्षेत्राकडे वळले. 

चंद्रशेखर वैद्य यांनी 110 हून अधिक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते 97 वर्षांचे असून इंडस्ट्रीत त्यांना चंद्रकांत साहेब म्हणून ओळखले जाते.

चंद्रशेखर हे अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शक देखील आहेत. त्यांनी चा चा चा तसेच स्ट्रीट सिंगर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ते रामानंद सागर यांचे खूप चांगले मित्र होते. त्यांनी रामायण या मालिकेत राजा दशरथ यांचे महामंत्री सुमंत यांची भूमिका साकारली होती. 

चंद्रशेखर यांचा जन्म 1923 ला झाला होता. त्यांनी काही वर्षं चौकीदार म्हणून काम केले होते. अभिनयाची आवड असल्याने ते या क्षेत्राकडे वळले. 

टॅग्स :बॉलिवूड