Join us
Daily Top 2Weekly Top 5

​उर्वषी ढोलकिया झळकणार चंद्रकांता या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 13:38 IST

उर्वषीने खूपच कमी वयात तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. देख भाई देख या मालिकेत तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. ...

उर्वषीने खूपच कमी वयात तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. देख भाई देख या मालिकेत तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर ती घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. पण कसोटी जिंदगी की या मालिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. कसोटी जिंदगी की या मालिकेतील कोमोलिका या व्यक्तिरेखेमुळे उर्वषी ढोलकिया हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेमुळे एक खलनायिका म्हणून ती नावारूपाला आली. पण या कार्यक्रमानंतर ती खूपच कमी मालिकांमध्ये झळकली. दरम्यानच्या काळात तिने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता आणि या मालिकेचे विजेतेपददेखील मिळवले होते. गेल्या वर्षी तिने बडे अच्छे लगते है या मालिकेतदेखील काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका खूपच कमी भागांची असली तरी महत्त्वाची होती. आता पुन्हा एकदा उर्वषी एका मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.चंद्रकांता ही नव्वदीच्या दशकातील गाजलेली मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेवर आधारित चंद्रकांता नावाची मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत उर्वषी एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ही मालिका बालाजी टेलिफ्लिम्सची असून उर्वषीने आतापर्यंत बालाजीच्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे बालाजीच्या या मालिकेतदेखील ती प्रमुख भूमिका साकारणार आहे. या मालिकेत ती नायिकेच्या आईची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत उर्वषीसोबतच मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंग प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.