Join us

​चंद्र-नंदिनी या मालिकेने पूर्ण केले 100 भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 13:38 IST

चंद्र-नंदिनी या मालिकेत श्वेता बासू प्रसाद आणि रजत टोकस प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेचे नुकतेच 100 भाग पूर्ण ...

चंद्र-नंदिनी या मालिकेत श्वेता बासू प्रसाद आणि रजत टोकस प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेचे नुकतेच 100 भाग पूर्ण केले. कोणत्याही मालिकेने 100 अथवा 500 चा टप्पा पूर्ण केल्यानंतर मालिकेची टीम केक कापून त्याचे सेलिब्रेशन करते. पण चंद्र-नंदिनी या मालिकेने केक न कापता सेटवर लाडू वाटून सेलिब्रेशन केले. चंद्र-नंदिनी या मालिकेत एका राजाची कथा दाखवली असल्याने त्यांनी एका राजाच्याच स्टाइलमध्ये मगधी लाडू वाटून सेलिब्रेशन केले. खरे तर या मालिकेतील सगळेच कलाकार हे डाएटवर आहेत. पण सगळ्यांनी त्या दिवशी त्यांच्या डाएटचा विचार न करता लाडवांवर ताव मारला. तसेच मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतर सगळे मिळून डिनरला गेले. चंद्र-नंदिनी या मालिकेद्वारे श्वेता बासू प्रसादने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या मालिकेत ती प्रेक्षकांना डबल रोलमध्ये पाहायला मिळत आहे. श्वेता या मालिकेत नंदिनी आणि रूपा अशा दोन भूमिका साकारते आहे. रूपा ही नंदिनीसारखी दिसत असली तरी ती स्वभावाने अतिशय दृष्ट स्त्री असल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. रूपा या मालिकेतील भूमिकेसाठी तिने मगधी भाषादेखील शिकली आहे. तर रजत टोकसने धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान, जोधा अकबर यांसारख्या ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तेरे लिये या मालिकेत रजत एक रोमँटिक हिरो म्हणून झळकला होता. चंद्र-नंदिनी या मालिकेतील श्वेता आणि रजतची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.100 भाग पूर्ण झाल्याबाबत चंद्र-नंदिनीच्या एपिसोडचा महावीक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात चंद्र-नंदिनी मृत्यूच्या सापळ्यात सापडल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.