Join us

चांदनीला केले हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 17:22 IST

एक था राजा एक थी राणी या मालिकेत लीपनंतर चांदनी भगवनानी महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. पण चांदनी ...

एक था राजा एक थी राणी या मालिकेत लीपनंतर चांदनी भगवनानी महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. पण चांदनी सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यामुळे ती या मालिकेचा भाग असणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चांदनीला गेल्या कित्येक दिवसांपासून ताप असून काही केल्या तो उतरत नाहीये. त्यामुळे काही टेस्टही करण्यात आल्या आहेत. या टेस्टचे रिपोर्ट लवकरच येणार आहेत. चांदनीला आजारपणामुळे खूपच अशक्तपणा आलेला आहे. पण तरीही नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात तिने उपस्थिती दर्शवली होती. या पुरस्कार सोहळ्यानंतर लगेचच तिला हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.