Join us

'चला हवा येऊ द्या' फेम तुषार देवलची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 14:57 IST

कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा शो गेल्या कित्येक वर्षापासून रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. 

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात.

या शोने फक्त कलाकारांनाच नाहीतर शोमध्ये इतर आर्टीस्ट्सनाही ओळख मिळवून दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे तुषार देवल. शोमध्ये तुषार संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळतो.त्याचबरोबर काही विनोदी स्कीटमध्येही त्याचा सहभाग असतो. या शोमुळे तुषारही प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. 

पण तुम्हाला माहिती आहे का ? तुषार जितका प्रसिद्ध आहे तितकीच त्याची पत्नीही प्रसिद्ध आहे. 'कुंकू', 'कळत नकळत', 'पारिजात', 'वादळवाट', 'विवाहबंधन', 'फु बाई फु', 'पुढचं पाऊल'  यांसह अनेक मालिकांमध्ये स्वाती देवलने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीतच नव्हे तर हिंदीतही स्वातीने काम केले आहे.'मिसेस तेंडुलकर' या गाजलेल्या मालिकेतही स्वातीने भूमिका साकारली होती.

स्वाती देवलही उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तुषारप्रमाणेच स्वातीनेही इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहेत.  तर दुसरीकडे तुषारनेही 'घडलंय बिघडलंय', 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज', 'रणवीर कॅफे', 'हास्यसम्राट' अशा अनेक शोजसाठी त्याने संगीत संयोजक म्हणून भूमिका बजावली आहे.

स्वाती आणि तुषार यांचे लव्हमॅरेज आहे. काही वर्ष डेट केल्यानंतर  2003 मध्ये दोघांनीही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.  तुषारला इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे.

 

त्याच्या संघर्षात पत्नी स्वातीनेही त्याला साथ दिली. त्याच्या प्रत्येकवेळी स्वाती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. आज दोघेही आपापल्या क्षेत्रात नाव कमावत असून सुखाने दोघांचा संसार सुरु आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्या