Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली- "फक्त माझाच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 11:00 IST

Shreya Bugde : श्रेया बुगडे हिने पती निखिल सेठच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी श्रेया बुगडे (Shreya Bugde) लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमातून श्रेया घराघरात पोहचली. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य फॉलोव्हर्स आहेत. श्रेयाच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान आता श्रेया बुगडे हिने पती निखिल सेठच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

श्रेया बुगडे हिने इंस्टाग्रामवर निखिलसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, तू दुर्लभ व्यक्तिमत्त्व आहेस. फक्त माझा..कायमचा माझा……इतकं निर्मळ अंत:करण इतर नाही....तू दुसऱ्यांसारखा नाही...तुझा खरेपणा आणि सुरक्षितता तुला एक ठोस माणूस बनवते...आणि तुला आयुष्यभर माझा म्हणवण्याइतपत मी भाग्यवान आहे….माझ्या 'वादळाला' 'शांत' केल्याबद्दल धन्यवाद आणि सर्व 'शब्दात मांडता येत नाही' !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निक. माझं तुझ्यावर प्रेम आहे. श्रेयाच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

अशी जमली जोडी...

पुण्यात जन्मलेली श्रेया बुगडे एका गुजराती कुटुंबातील सून आहे.  श्रेया आणि निखिल सेठ यांचे लव्ह मॅरेज आहे. २७ डिसेंबर २०१५ रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचे लग्न झाले. 'मांडला दोन घडीचा डाव' या मालिकेच्या शुटिंग दरम्यान या दोघांची पहिली भेट झाली. पण, पहिल्याच भेटीत निखील हा श्रेयाला उद्धट वाटला होता. ही मालिका सुरू झाल्याच्या ५ महिन्यांच्यानंतर निखीलने ही मालिका सोडली.  त्यानंतर गुंतता हृदय हे या मालिकेचा निखील हा कार्यकारी निर्माता बनला आहे. मालिकेचा प्रोमा चांगला झाल्यामुळे श्रेयाने त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या संवादाला सुरुवात झाली. नंतर श्रेया निखिलच्या प्रेमात पडली. अखेर कुटुंबीयांच्या सहमतीने दोघांनी लग्नगाठ बांधली.

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्या