Join us

'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेचं मोठं यश, म्हणाला-'सांगायला आनंद होत आहे की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 16:26 IST

Chala hawa yeu dya : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अंकुर वाढवे सध्या चर्चेत आहे. त्यानं सोशल मीडियावर अशी एक पोस्ट शेअर केली आहे की, त्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरून हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता अंकुर वाढवेचाही यात समावेश आहे.

अंकुर वाढवेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. अंकुर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अंकुरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे.

त्यात त्यानं म्हटलं आहे की, ' सांगायला आनंद होत आहे की, अपंग प्रवर्गातून NET (नॅशनल एलिजिबल टेस्ट)२०२२ performing arts विषयामध्ये JRF घेऊन भारतातून एकमेव परीक्षाार्थी म्हणून मी पास झालो.अंकुरनं ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या शोमधील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांच्या मनात घर करून आहेत. अगदी त्याच प्रमाणे अंकुर वाढवे या कलाकारावरही रसिक भरभरून प्रेम करतात. याच शोने अंकुरला ओळख मिळवून दिली. . अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स आणि कन्हैया या नाटकात काम केले आहे.

टॅग्स :चला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार