अनुजला शोधण्यासाठी सीबीआयचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 13:08 IST
कुसुम, कुमकुम यांसारख्या मालिकांमुळे प्रकशझोतात आलेला अभिनेता अनुज सक्सेना सध्या सीबीआयच्या रडारवर आहे. अनुजच्या शोधासाठी दिल्लीत सीबीआयने अनेक ठिकाणी ...
अनुजला शोधण्यासाठी सीबीआयचे छापे
कुसुम, कुमकुम यांसारख्या मालिकांमुळे प्रकशझोतात आलेला अभिनेता अनुज सक्सेना सध्या सीबीआयच्या रडारवर आहे. अनुजच्या शोधासाठी दिल्लीत सीबीआयने अनेक ठिकाणी छापे टाकलेले आहेत. अनुजने अभिनय करण्यासोबतच आलू चाट या चित्रपटाची, देवायनी या मराठी मालिकेची निर्मिती केलेली आहे. अनुज एक प्रसिद्ध व्यवसायिकही आहे. अनुजच्या एल्डर फार्मास्युटिकल कंपनीच्या माध्यमातून दुबई आणि बल्जेरियासह अन्य देशातील कंपन्यांना पैसा पुरवण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. अनुजच्या कंपनीवर जवळजवळ 138 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याची चौकशी करणारा अहवाल दाबण्यासाठी त्याने संबंधित अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. अनुजने लाच देण्यासाठी दिल्लीत मध्यस्थाचा शोध घेतला होता. या प्रकरणातला दलाल विश्वदीप बन्सलला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलिस अनुजचा शोध घेत आहेत.