Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कसौटी झिंदगी के’च्या टीमची स्वित्झर्लंडवारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 07:15 IST

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ या लोकप्रिय मालिकेच्या कथानकात नेहमीच काही अनपेक्षित घटना घडत असतात आणि प्रेक्षकांना किती पाहू आणि किती नको असे होऊन जाते.

ठळक मुद्दे मिस्टर बजाज या व्यक्तिरेखेचा प्रवेश स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ या लोकप्रिय मालिकेच्या कथानकात नेहमीच काही अनपेक्षित घटना घडत असतात आणि प्रेक्षकांना किती पाहू आणि किती नको असे होऊन जाते. ही प्रेमकथा नेहमीच चांगल्या गोष्टींमुळे चर्चेत राहात असून तिला प्रचंड मोठा चाहतावर्ग लाभला आहे. आता मालिकेतील बहुचर्चित अशा मिस्टर. बजाज या व्यक्तिरेखेच्या प्रवेशाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांसाठी एक खुशखबर अशी आहे की मिस्टर बजाज या व्यक्तिरेखेचा प्रवेश स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे.

अभिनेता करणसिंह ग्रोव्हर हा मिस्टर. बजाजची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जाते. मिस्टर बजाज हा गर्भश्रीमंत उद्योगपती असल्याने निर्मात्यांनी त्याचा मालिकेतील प्रवेश स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य स्थळी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यक्तिरेखेचे महत्त्व लक्षात घेता मालिकेतील तिच्या प्रवेशासाठी स्वित्झर्लंडखेरीज दुसरी चांगली जागा नव्हती, असे निर्मात्यांचे म्हणणे असून त्यांनी    स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरण करण्यासाठी आवश्यक ते परवाने आधीच मिळविले आहेत, असे सांगितले जाते. मिस्टर बजाजच्या  व्यक्तिरेखेखेरीज मालिकेतील नायक-नायिका आणि काही प्रमुख व्यक्तिरेखाही स्वित्झर्लंडला जाण्याच्या तयारीत आहेत. 

आपल्या धडाकेबाज व्यक्तिमत्त्वासाठी मिस्टर. बजाज ओळखला जात असल्याने ‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ या लोकप्रिय मालिकेत त्याचा प्रवेशही दणक्यातच होणार आहे, असे दिसते. ही बहुप्रतीक्षित व्यक्तिरेखा आता लवकरच मालिकेत प्रवेश करणार असून त्यामुळे तिची प्रेक्षणीयता आणि रंजकता नक्कीच वाढेल.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2