Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसच्या घरात 'या' दोन सदस्यांमध्ये रंगणार कॅप्टनसी टास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 16:03 IST

नंदकिशोर, स्मिता, मेघा आणि शर्मिष्ठा यांनमध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कोण उभे राहील यामध्ये वाद – विवाद सुरु झाले.

ठळक मुद्देआज घरामध्ये हटके पद्धतीने पूल वॉलीबॉल खेळण्यात येणार आहे

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगलेल्या “घरोघरी मातीच्या चुली” या कार्यामध्ये मेघाची टीम विजयी ठरली होती. त्यानुसारच कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी विजयी टीममधील दोन सदस्यांना ही उमेदवारी द्यायची आहे असे बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना काल सांगितले. त्यानुसार नंदकिशोर, स्मिता, मेघा आणि शर्मिष्ठा यांनमध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कोण उभे राहील यामध्ये वाद – विवाद सुरु झाले. शेवटपर्यंत नंदकिशोर, स्मिता, मेघा आणि शर्मिष्ठा यांची टीम या निर्णयापर्यंत पोहोचू शकली नाही आणि त्यामुळेच विरुध्द टीमला हा निर्णय घेण्याची जबाबबदारी सोपवली. त्या टीमने स्मिता आणि नंदकिशोर यांना कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे केले. आज नंदकिशोर आणि स्मिता या दोघांच्या टीममध्ये कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे. हे कार्य महेश मांजरेकर यांनी आखून दिले आहे. आज घरामध्ये हटके पद्धतीने पूल वॉलीबॉल खेळण्यात येणार आहे. या कार्यानिमित्त घरातील सदस्यांची चार टीम्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. तेव्हा आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनेल हे बघणे रंजक असणार आहे.  

काल मेघा आणि पुष्कर मध्ये झालेल्या वादामध्ये पूर्ण घर मेघा विरुध्द होते. शर्मिष्ठा आणि स्मिता तितक्या या वादामध्ये सहभागी नव्हत्या झाल्या. परंतु रेशम, आस्ताद, नंदकिशोर, पुष्कर आणि सई या सगळ्यांनीच मेघाला ती खोटारडी आहे असे म्हंटले. मेघाने देखील तिला आलेला राग व्यक्त केला. आज मेघा पुष्करशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु पुष्कर मेघाला त्याला तिच्याशी बोलण्यात रस नाही असे सांगणार आहे. हे भांडण कधी पर्यंत असेच सुरु रहाणार ? आज महेश विकेंडचा डाव मध्ये महेश मांजरेकर घरातील सदस्यांना काय गाईडन्स देतील ? कोणाची शाळा घेतील ? हे बघणे रंजक असणार आहे.