Join us

११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:39 IST

Hina Khan Rocky Jaiswal Love Story: हिना खान नुकतंच तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली. हिनाची लव्हस्टोरी एकदम हटके आहे. जी वाचून तुमचाही खऱ्या प्रेमावर विश्वास बसेल

कॅन्सरशी लढा देणारी अभिनेत्री हिना खान (Hina Khan) नुकतीच लग्नबंधनात अडकली. हिना खानने तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल (Rocky Jaiswal) सोबत लग्न केलं. हिना खान आणि रॉकीने लग्न करताच अनेकांनी त्यांचं कमेंटच्या माध्यमातून अभिनंदन केलं. हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. या कठीण काळात तिचा बॉयफ्रेंड रॉकीने तिची साथ सोडली नाही. इतकंच नव्हे दोघांच्या प्रेमाचा प्रवास आता लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे. या  दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली, जाणून घ्या

अशी आहे हिना-रॉकीची लव्हस्टोरी

हिना खानने आणि रॉकीची लव्हस्टोरी जरा हटके आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या सेटवर २०११ मध्ये त्यांची ओळख झाली होती. या मालिकेत हिना मुख्य भूमिका साकारत होती आणि रॉकी या मालिकेचा सुपरवायझिंग प्रोड्यूसर होता. मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री वाढली. पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. ११ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हिना आणि रॉकीने एकमेकांशी लग्न केलं. रॉकी हिनापेक्षा ८ महिन्यांनी मोठा आहे. कॅन्सरच्या कठीण काळात रॉकी हा हिना आणि तिच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. 

हिना आणि रॉकीच्या लग्नाची चर्चा

हिनाचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत दिसतंय की, तिने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली हिरव्या रंगाची हँडलूम साडी परिधान केली होतीय. या साडीवर चांदीच्या धाग्यांनी '८' अंकाचे चिन्ह आणि रॉकी - हिना या दोघांची नावं भरतकाम केलेली होती. चांदीच्या धाग्यांमध्ये विणलेला '८' अंक हा अमर्याद प्रेमाचे एक रुप आहे. हिनाच्या हातावर मेहंदीमध्ये कमळ फुलाचे डिझाईन दिसले. अशाप्रकारे साध्या पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता हिनाने बॉयफ्रेंडसोब लग्नगाठ बांधली

टॅग्स :हिना खानटेलिव्हिजनलग्नटिव्ही कलाकारदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टकर्करोग