Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कल्याणी सापडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 20:44 IST

स्टार प्रवाह वरील ‘पुढचं पाऊल’ ही मालिका घराघरात पोहचून अत्यंत लोकप्रिय होत आहे. आक्कासाहेब आणि कल्याणी प्रत्येकांच्या घरातले सदस्य ...

स्टार प्रवाह वरील ‘पुढचं पाऊल’ ही मालिका घराघरात पोहचून अत्यंत लोकप्रिय होत आहे. आक्कासाहेब आणि कल्याणी प्रत्येकांच्या घरातले सदस्य आहेत की काय असे वाटायला लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीतली प्रत्येक गोष्टी प्रत्येक घरांत चर्चेचा विषय बनत आहे. आक्कासाहेबांना किडनी रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळतं आणि गुन्हेगाºयांना पोलिसांच्या हवाली केले जाते. पण अचानक  कल्याणी हॉस्पिटलमधून गायब झाल्याने सर्वांना धक्का बसतो. आक्कासाहेब पोलिसांच्या मदतीने कल्याणीचा शोध घेऊन पण तिचा पत्ता लागत नाही.किडनी रॅकेट पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी कल्याणी आता कुठे गायब झाली असेल याची सर्वांना काळजी वाटत असते. एका माणसाकडून कळते की कल्याणी सारखी मुलगी एका व्यक्तीबरोबर मुंबईला जाताना बघितले. कल्याणीचा शोध घेण्यासाठी आक्कासाहेब मुंबईला जाणार का, कल्याणी सापडणार का या विषयी प्रेक्षकांना प्रश्न पडले असतील.