रितूचा आठ वर्षांनंतर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 16:24 IST
क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत शोभाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रितू सेठ तब्बल आठ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर ...
रितूचा आठ वर्षांनंतर कमबॅक
क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत शोभाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रितू सेठ तब्बल आठ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. बडे भैय्या की दुल्हनिया या मालिकेत रितू नायकाच्या काकीच्या भूमिकेत झळकणार आहे. क्योंकी साँस भी कभी बहू थी ही मालिका संपल्यानंतर रितूने तिच्या वैयक्तिक कारणांमुळे छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता. आता रितूची मुलगी पाच वर्षांची असल्याने तिच्याकडे आता तिला तितकेसे लक्ष द्यावे लागत नसल्याने तिने मालिकेत येण्याचा विचार केला आहे. या मालिकेत रितू काकीच्या भूमिकेत असली तरी तिची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.