Join us
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात टीम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 13:12 IST

मालिकेचे चित्रीकरण हे अनेक तास सुरू असते. त्यामुळे मालिकेतील कलाकार आपल्या कुटुंबीयांसोबत जितका वेळ घालवत नाहीत तितका वेळ त्यांच्या ...

मालिकेचे चित्रीकरण हे अनेक तास सुरू असते. त्यामुळे मालिकेतील कलाकार आपल्या कुटुंबीयांसोबत जितका वेळ घालवत नाहीत तितका वेळ त्यांच्या सहकलाकारांसोबत घालवतात. त्यामुळे एक वेगळेच नाते त्यांच्यात निर्माण होते. साथ निभाना साथिया या मालिकेत तान्या शर्मा प्रेक्षकांना मीरा ही भूमिका साकारताना पाहायला मिळते. मीराचा वाढदिवस नुकताच झाला. तिच्या वाढदिवसाला तिने एक भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला तिने तिच्या अनेक मित्रमैत्रिणींना बोलावले होते. या पार्टीला साथ निभाना साथिया या मालिकेतील तिचे सगळेच सहलाकार उपस्थित होते. देवोलिना भट्टाचार्जी, मोहोम्मद नझीम, पूजा गौर, कुणाल सिंग या तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांनी पार्टीत खूप धमाल मस्ती केली. अमर उपाध्यायने तर त्याच्या पत्नीसह या पार्टीला हजेरी लावली. तान्याचे सहकलाकार तिच्या स्पेशल डेला खास तिच्यासाठी आले असल्याने ती खूपच खूश झाली होती.