याला म्हणतात भाग्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 16:09 IST
इश्कबाज या मालिकेत प्रियांकाची भूमिका साकारणारी सुभा रजपूत लवकरच सनशाईन म्युझिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स या चित्रपटात झळकणार आहे. या ...
याला म्हणतात भाग्य
इश्कबाज या मालिकेत प्रियांकाची भूमिका साकारणारी सुभा रजपूत लवकरच सनशाईन म्युझिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती दिल्लीत राहाणाऱ्या एका कॉलेज तरुणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा चित्रपट तिला योगायोगाने मिळाला. ती सांगते, "मी एका मालिकेच्या ऑडिशनसाठी गेले होते. त्या मालिकेच्या ऑडिशनसाठी मी जिममध्ये घालतात ते कपडे घातले होते. या ऑडिशनच्या बाजूलाच सनशाईन चित्रपटासाठी ऑडिशन सुरू होती. मला तिथे चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने पाहिले आणि मला या चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला सांगितले. ऑडिशननंतर या चित्रपटासाठी माझी निवड झाली. मी कधीही विचार केलेला नसताना ही संधी माझ्याकडे चालून आली याचा मला आनंद आहे."