याला म्हणतात नशिबवान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 17:07 IST
छोट्या पडद्यावर अनेक वर्षं स्ट्रगल करूनही अनेक कलाकारांना चांगल्या भूमिका मिळत नाहीत. पण याबाबतीत अभिनेत्री इशानी शर्मा प्रचंड भाग्यवान ...
याला म्हणतात नशिबवान
छोट्या पडद्यावर अनेक वर्षं स्ट्रगल करूनही अनेक कलाकारांना चांगल्या भूमिका मिळत नाहीत. पण याबाबतीत अभिनेत्री इशानी शर्मा प्रचंड भाग्यवान ठरली आहे. इशानी हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे या आगामी मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. पहिल्याच मालिकेत इतकी चांगली संधी मिळाल्याबद्दल ती सध्या प्रचंड खूश आहे. इशानी या मालिकेत अनोखी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. अनोखी या व्यक्तिरेखेने तिला पैशांचे महत्त्व शिकवले आहे असे ती सांगते.