Join us
Daily Top 2Weekly Top 5

किकू शारदाने केली न्यूज अँकरची नक्कल; संतापलेले नेटकरी म्हणाले, Boycott KapilSharmaShow

By रूपाली मुधोळकर | Updated: October 5, 2020 13:38 IST

सोशल मीडियावर का ट्रेंड झाला #BoycottKapilSharmaShow

ठळक मुद्दे‘द कपिल शर्मा शो’वर बहिष्कार करण्याची मागणी करताना नेटक-यांनी सलमान खानचेही नाव या वादात गोवले.

आज सोमवारी सोशल मीडियावर ‘#BoycottKapilSharmaShow’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला. एका व्हायरल व्हिडीओमुळे चाहते संतापले आणि त्यांनी या शोवर बहिष्कार घालण्याची मागणी लावून धरली. सर्वांना खळखळून हसवणा-या या शोमध्ये असे काय झाले की, लोक संतापले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुढे वाचा.तर तूर्तास ‘द कपिल शर्मा शो’चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत कॉमेडियन किकू शारदा टीव्ही अँकर अर्नब गोस्वामी यांची नक्कल करताना दिसतोय. ‘मुझे जग दो, मुझे जग दो...,’ असे किकू अर्नब गोस्वामींची नक्कल करताना म्हणतोय.

रविवारी 4 ऑक्टोबरला हा एपिसोड प्रसारित झाला होता. या एपिसोडचा हा व्हिडीओ आहे. या एपिसोडमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा गेस्ट म्हणून आले होते.

हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला. हजारो लोकांनी शेअर केला आणि काही जणांनी हा व्हिडीओ पाहून ‘द कपिल शर्मा शो’ जबरदस्त भडास काढली. कपिल शर्माने याबद्दल माफी मागावी, अशी मागणी नेटक-यांनी केली.

सलमानचेही नाव...

‘द कपिल शर्मा शो’वर बहिष्कार करण्याची मागणी करताना नेटक-यांनी सलमान खानचेही नाव या वादात गोवले. सलमान हा शो प्रोड्यूस करतोय आणि तो जाणीवपूर्वक अर्नब गोस्वामी व त्यांच्या चॅनलला लक्ष्य करतोय, असा आरोप नेटक-यांनी केला.

एक वाह्याात शो - मुकेश खन्नायापूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘महाभारत’ या मालिकेच्या अनेक निवडक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र महाभारतात भीष्म पितामहची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हे अनुपस्थित होते. मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये का आले नाहीत? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला होता. अनेक सोशल मीडिया युजर्सनी थेट मुकेश खन्ना यांनाच हा सवाल केला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल मुकेश खन्ना यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक टिष्ट्वट करत ‘द कपिल शर्मा शो’ एक वाह्याात शो आहे, असे म्हटले होते. अर्थात काहीच वेळात त्यांनी हे ट्वीट डिलीटही केले होते. ‘द कपिल शर्मा शो’ भलेही देशभर लोकप्रिय असले. पण मी यापेक्षा दुसरा वाहयात शो पाहिला नाही. द्विअर्थी संवाद, पांचट विनोदांशिवाय यात काहीही नाही. पुरूष महिलांचे कपडे घालून किळसवाणे विनोद करतात आणि लोक त्यावर हसतात, असे त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले होते.

'हे' मराठी वाक्य कपिल शर्माला समजेना, रितेश म्हणाला मी सांगू का?

यापेक्षा दुसरा वाह्यात शो नाही...! मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’वर बरसले

टॅग्स :द कपिल शर्मा शोकिकू शारदा