रियालिटी शोला रसिक कंटाळले ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 16:39 IST
नुकत्याच जाहीर झालेल्या टीआरपी रेटिंग्समध्ये द कपिल शर्मा शोला अव्वल पाचमध्ये स्थान मिळालेलं नाही ही गोष्ट जितकी आश्चर्यजनक आहे. ...
रियालिटी शोला रसिक कंटाळले ?
नुकत्याच जाहीर झालेल्या टीआरपी रेटिंग्समध्ये द कपिल शर्मा शोला अव्वल पाचमध्ये स्थान मिळालेलं नाही ही गोष्ट जितकी आश्चर्यजनक आहे. त्याहून धक्कादायक वाटणारी गोष्ट म्हणजे या रेटिंग्समध्ये रियालिटी शोलाही स्थान मिळालं नाही. सध्या प्रत्येक टीव्ही चॅनेल्सवर रियालिटी शोची धूम आहे. असं असतानाही एकाही रियालिटी शोची टीआरपी रेटिंगमध्ये जादू चालली नसल्याचं समोर आलंय. रियालिटी शो किती रियल असतात असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत होता. मात्र आता या रेटिंग्समुळं रियालिटी शोलाही छोट्या पडद्यावरील रसिक कंटाळलेत की काय असं म्हणण्याची वेळ आलीय.