रसिकांनी दिला उदंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 13:51 IST
बन मस्का या कार्यक्रमाचे शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीस येऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. पण या गाण्याला प्रेक्षकांचा खूपच चांगला ...
रसिकांनी दिला उदंड प्रतिसाद
बन मस्का या कार्यक्रमाचे शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीस येऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. पण या गाण्याला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेचे शीर्षक गीत डिजिटल माध्यातून प्रदर्शित करण्यात आले होते. हे शीर्षक आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले असून त्यांना हे आवडतदेखील आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याचे छायाचित्रण महेश लिमये यांनी केले आहे. हे गाणे जसराज जोशी आणि सोनिया मुंढेने गायले आहे. सोनियाचे हे पहिलेच गाणे आहे. हे गाणे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे शिवानी रांगोळे आणि शिवराज वैचल यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.