Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांच्या लाडक्या ‘शेवंता’चा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 13:19 IST

आज याच शेवंताचा अर्थात अपूर्वाचा वाढदिवस.

ठळक मुद्दे‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने 7 ते 8 किलो वजन वाढवले.

रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय.  शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. आज याच शेवंताचा अर्थात अपूर्वाचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...

 27 डिसेंबर 1988 रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.

कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अ‍ॅक्टिंगच्या ऑफर येणे सुरु झाले होते. पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरे तर तिला एमबीए करायचे होते. पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते, असे अपूर्वा नेहमी म्हणते.

अपूर्वाने इव्हेंट मॅनेजरमेंट कंपनीद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यापूर्वीच अभिनयातही एन्ट्री केली होती. आभास हा या मालिकेची आॅफर स्वीकारल्यानंतर एकीकडे स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि दुसरीकडे अभिनय अशी तिची कसरत सुरु होती.   

 पुढे तिने स्वत:चा इमिटेशन ज्वेलरी डिझाईनिंगचा ब्रँडही काढला. 

  अपूवार्ला कार चालवायला प्रचंड आवडते.  एकटीला भटकायलाही खूप आवडते. अपूर्वा आपली कार घेऊन देशभरात अनेक ठिकाणी एकटी फिरली आहे. 

रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने 7 ते 8 किलो वजन वाढवले.

टॅग्स :रात्रीस खेळ चालेअपूर्वा नेमळेकर