Join us
Daily Top 2Weekly Top 5

करण-अनुष्काने कापला बिपाशा-करणचा पत्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 14:37 IST

लव्ह स्कूल या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांनी केले ...

लव्ह स्कूल या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांनी केले होते. उपेन आणि करिश्मा यांच्या ब्रेकअपनंतर एखाद्या प्रसिद्ध जोडीने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळावी असे या कार्यक्रमाच्या टीमचे म्हणणे होते. यासाठी करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूचा विचारदेखील करण्यात आला होता. पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही आणि आता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रेटी कपल करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकर करणार असल्याची चर्चा आहे. त्या दोघांना फॅन फॉलॉविंग खूप असून ते तरुणांचे लाडके असल्याने प्रोडक्शन हाऊसने त्यांच्या नावाचा विचार केला असल्याचे म्हटले जात आहे.