'भाभीजी घर पर है' या मालिकेत नुकतीच सनी लिओनीने हजेरी लावली. तिच्या पाठोपाठ आता बिपाशा बासू, तिचा पती करणसिंग ग्रोवरसह या मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेत बिपाशाला येण्यासाठी विचारण्यात आले तेव्हा ती खूपच खूष झाली, कारण तिच्या आई-वडिलांची ही आवडती मालिका असल्याचे बिपाशाने म्हटले आहे. मालिकेला रसिकांसोबत बॉलिवूड सेलिब्रेटींचेही प्रेम मिळते आहे. त्यामुळे खूपच आनंद होतो. मी बिपाशा- करण सोबत कधीच काम केले नव्हते. या मालिकेच्या निमित्ताने बिपाशासह काम करण्याची संधीही मिळणार असल्यामुळे खूप आनंदी असल्याचे ‘अंगुरी भाभी’ फेम शुभांगी अत्रे हिने सांगितले. करण सिंहने त्याच्या करिअरची सुरूवातही छोट्या पडद्यावरच केली होती. त्यामुळे बिपाशासह करण सिंहला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहणे रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
बिपाशा-करण म्हणणार 'भाभीजी घर पर है'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 11:12 IST