Join us

पाचव्यांदा बाबा होणार 'बिग बॉस' फेम कलाकार, बायकोने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:25 IST

पाचव्यांदा बाबा होणार 'बिग बॉस' फेम लोकप्रिय कलाकार, दुसरी पत्नी दुसऱ्यांदा गरोदर. सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झालेला एक कलाकार एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर पाचव्यांदा बाबा होणार आहे. हा कलाकार आहे अरमान मलिक. लोकप्रिय यूट्यूबर अरमान मलिक (armaan malik) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक (krutika malik) पुन्हा गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. कृतिकाने स्वतः तिच्या यूट्यूबद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या बातमीने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. दुसरी पत्नी दुसऱ्यांदा गरोदर असल्याने अरमान पाचव्यांदा बाबा होणार आहे.

अरमान पाचव्यांदा होणार बाबा

अरमानची दुसरी बायको कृतिका मलिकने तिच्या युट्यूबद्वारे सांगितलं की, ती सध्या एक महिन्यांची गरोदर आहेत आणि पुढील वर्षी मे किंवा जूनमध्ये बाळाचा जन्म अपेक्षित आहे. या बातमीने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अरमान मलिकला यापूर्वी चार मुले आहेत. चिरायु, तुबा, अयान आणि झैद ही अरमानच्या चार मुलांची नावं आहेत. कृतिका आणि अरमान यांचा पहिला मुलगा झैदचा जन्म एप्रिल २०२३ मध्ये झाला होता. कृतिका पुन्हा प्रेग्नंट असल्याने अरमान आणि त्याच्या कुटुंबाच्या आनंदाला उधाण आलं आहे.

बायकोने दिलेल्या गुड न्यूजवर अरमान मलिकने प्रतिक्रिया देताना सांगितले की, "माझा अंदाज बरोबर ठरला, आपल्याला पाच मुले होणार आहेत." त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगितली आणि सर्वांनी आनंदाने ती स्वीकारली. अरमान मलिकची पहिली पत्नी पायलने सुद्धा या बातमीवर आनंद व्यक्त केला आहे. आता कृतिका खरंच गरोदर आहे की ती प्रँक करतेय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

अरमानचं मोठं कुटुंब

अरमान मलिकचे कुटुंब त्याच्या अनोख्या कुटुंबव्यवस्थेमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. अरमानने २०११ मध्ये पायल मलिकशी विवाह केला. पुढे २०१८ मध्ये पायलची मैत्रिण कृतिका मलिकशी अरमानने दुसरा विवाह केला. दोन्ही पत्नींसोबत अरमानचे चांगले संबंध असून ते एकत्रित राहतात. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी ३ मध्ये सहभागी झाला होता.

टॅग्स :अरमान मलिकबिग बॉसटेलिव्हिजन