Bigg Boss: 'दिल चीज क्या है..गाण्यावर सब्यसाचीने केला मुजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 17:16 IST
बिग बॉसच्या घरात स्पर्धक रसिकांचे लक्ष वेधुन घेण्यासाठी ना-ना शक्कल लढवताना दिसतायेत. त्यात आता सब्यासाची या स्पर्धकाने चक्क उमराव ...
Bigg Boss: 'दिल चीज क्या है..गाण्यावर सब्यसाचीने केला मुजरा
बिग बॉसच्या घरात स्पर्धक रसिकांचे लक्ष वेधुन घेण्यासाठी ना-ना शक्कल लढवताना दिसतायेत. त्यात आता सब्यासाची या स्पर्धकाने चक्क उमराव जान सिनेमातला सुपरहिट गाणं 'दिल चीज क्या है...' यावर मुजरा करत रसिकांआधी घरातल्या स्पर्धकांचे फुल ऑन मनोरंजन केले. सध्या बिग बॉसच्या इतर स्पर्धकांप्रमाणे सब्यासाचीही चर्चा होतेय.सब्यसाची हा कोणत्याही वादामुळे नव्हे तर त्याच्या परफॉर्मन्समुळे चर्चेत आहे. सब्यसाचीने बिग बॉसच्या घरात मुजरा सादर करून स्पर्धकांना खुश केले आहे.सध्या या बिग बॉसमध्ये सब्यसाचीने केलेल्या मुजरा परफॉर्मन्सचा व्हिडीओही बिग बॉसच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ रसिकांना आवडला असून शोमध्ये जेव्हा सब्यासाची हा परफॉर्मन्स करताना दिसेल तेव्हा नक्कीच रसिकांचे मनोरंजन होणार यामध्ये काही शंका नाही.