Join us

बापरे! यूट्यूबर अभिषेक मल्हानचे लाखो रुपये गेले चोरीला; आली वडिलांची आठवण, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 13:17 IST

Abhishek Malhan : अभिषेकचे दीड लाख रुपये चोरीला गेले आहेत. अभिषेकने एका व्हिडिओमध्ये याचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये त्याने या संपूर्ण प्रकरणावर उघडपणे भाष्य केलं आहे.

प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 फेम अभिषेक मल्हानसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेकचे दीड लाख रुपये चोरीला गेले आहेत. अभिषेकने एका व्हिडिओमध्ये याचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये त्याने या संपूर्ण प्रकरणावर उघडपणे भाष्य केलं आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, प्रवासादरम्यान त्याच्यासोबत ही घटना घडली आहे.

अभिषेक मल्हानची आई डिंपल मल्हान यांनी लेटेस्ट व्लॉग शेअर केला आहे. या व्हिडीओमध्येच त्याने सांगितलं की, प्रवासादरम्यान त्याचे दीड लाख रुपये चोरीला गेले. व्हिडिओच्या सुरुवातीला यूट्यूबर म्हणतो, "मी दीड लाख रुपये आणले होते, मला कोणालातरी आयफोन गिफ्ट करायचा होता, त्याचं पेमेंट बाकी आहे. पण आता बॅग पाहिल्यावर त्यात पैसे नाहीत, माझे हार्ट बीट वाढत आहेत."

पुढे व्लॉगमध्ये अभिषेकने सांगितलं की, त्याने पहिल्यांदाच इतके पैसे रोख स्वरूपात आणले आहेत. यानंतर त्याला वडिलांचे शब्द पुन्हा आठवले, "पप्पांनी मला आधीच सांगितलं होतं की पैसे जपून ठेव, मी त्यांना सांगत राहिलो की हो, मी काळजीपूर्वक ठेवेन. पण असं काही घडेल याची कल्पना नव्हती. काय करू समजत नाही."

अभिषेकचे चाहतेही त्याच्या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि काळजी करू नको असा सल्ला देत आहेत. अभिषेक मल्हान बिग बॉस OTT 2 मध्ये दिसला होता. या शोमध्ये तो फर्स्ट रनर अप होता. याशिवाय, तो यूट्यूबवर खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचे व्हिडीओ खूप पाहिले जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.