Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस : सलमानसमोर स्वामी ओम नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 18:40 IST

इंडस्ट्रीचा भाई अशी ओळख असलेल्या सलमान खानसमोर भलेभले नतमस्तक होतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बिग बॉस सीजन ...

इंडस्ट्रीचा भाई अशी ओळख असलेल्या सलमान खानसमोर भलेभले नतमस्तक होतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बिग बॉस सीजन दहाचा खलनायक असा शिक्कामोर्तब झालेल्या स्वामी ओमसमोर सलमान खान येताच त्यांनी त्याच्यासमोर नतमस्तक होत, ‘माझ्यावर कृपादृष्टी असू द्यावी’ अशी विनवणी केली. सलमानचा ‘वीकेण्ड का वॉर’ हा एपिसोड न्यू इयर स्पेशल म्हणून सेलिब्रेट केला गेला. यावेळेस सलमानने थेट घरात हजेरी लावत घरवाल्यांसोबत धमाल केली. नवीन वर्षांचे जंगी स्वागत करण्यासाठी कलर्सच्या ‘झलक दिखला जा’च्या स्पर्धकांनी घरात परफॉर्मन्स करून घरवाल्यांचे मनोरंजन केले. घरात करिष्मा तन्ना हिने जबरदस्त परफॉर्म करीत घरवाल्यांना घायाळ केले. त्यातच तिच्या परफॉर्मदरम्यान सलमान खानने घरात एंट्री केल्याने घरवाल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. }}}} ">http://गेटमधून घरात प्रवेश करताच मनवीर ओरडत सलमानच्या दिशेने धावत गेला. त्याच्यापाठोपाठ मनूही गेला. दोघांची गळाभेट झाल्यानंतर स्वामी ओम सलमानच्या दिशेने धावत गेले. त्यांनी थेट सलमानच्या पायाला स्पर्श करीत आशीर्वाद घेतले. तसेच ‘माझ्यावर कृपादृष्टी असू द्यावी’ असेही म्हटले. सलमाननेही स्वामी ओमला एक जोरदार झप्पी देत बाजूला सारले. सलमान जेवढा वेळ घरात होता तेवढा वेळ स्वामी ओम त्याच्या पाठोपाठ फिरत होते. शिवाय सलमानशी बोलण्याची एकही संधी सोडत नव्हते. बिग बॉसच्या या सीजनचा पहिला एपिसोड जर तुम्हाला आठवत असेल तर हेच स्वामी ओम सलमानला आशीर्वाद देताना बघावयास मिळाले होते. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, तू जागतिक दर्जाचा स्टार बनावा, शिवाय तुझा विवाह लवकरच होवो अशाप्रकारचे आशीर्वाद देत होतो. आज हेच स्वामी सलमानकडून आशीर्वाद घेताना बघावयास मिळत आहेत. खरं तर ही सर्व बिग बॉसची महिमा आहे. कोणाला होत्याचं नव्हतं करणे बिग बॉसला उत्तम जमते, असेच म्हणावे लागेल.