बिग बॉस : सलमानने केले स्वामी ओमचे तोंड बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 18:45 IST
प्रत्येक मुद्द्यावर अनावश्यक मत व्यक्त करणाºया तथाकथित बाबा स्वामी ओमचे सलमाने अखेर तोंड बंद केले. मनवीर स्वामी ओमच्या तोंडावर ...
बिग बॉस : सलमानने केले स्वामी ओमचे तोंड बंद
प्रत्येक मुद्द्यावर अनावश्यक मत व्यक्त करणाºया तथाकथित बाबा स्वामी ओमचे सलमाने अखेर तोंड बंद केले. मनवीर स्वामी ओमच्या तोंडावर कपडा बांधण्यास सांगत, मध्ये बोलायचे नाही असा सज्जड दम भरला. त्यामुळे स्वामी ओम संपूर्ण शोमध्ये तोंडावर कपडा बांधून बसलेले होते. }}}} या आठवड्याचा सलमानचा ‘वीकेण्ड का वॉर’ हा एपिसोड चांगलाच वादग्रस्त ठरला. सलमानने प्रियंका जग्गा हिची घरातून हकालपट्टी केल्यानंतर स्वामी ओमचे तोंड बंद केल्याने घरातील सर्वच सदस्य दंग राहिले. कधी नव्हे ते सलमानचा एवढा संताप बघितल्याने संपूर्ण शोदरम्यान एकाही सदस्याने सलमानच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्याचे धाडस केले नाही. }}}} शो सुरू होताच स्वामी ओमने नेहमीप्रमाणे आपल्या अनावश्यक प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यावर संतापलेल्या सलमानने मनवीरला स्वामी ओमच्या तोंडावर कपडा बांधण्यास सांगितले. तसेच पुन्हा अनावश्यक प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत, असा दम भरला. सलमानचा अवतार बघून घरातील सगळ्यांचीच बोलती बंद झाली.