Join us

Bigg Boss OTT : अन् बिग बॉसच्या सेटवर बाथ्रोब घालून पोहोचला झीशान खान, करणही झाला हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 17:46 IST

Bigg Boss OTT : काहीच तासांत बिग बॉस ओटीटीचा ग्रँड प्रीमिअर सुरू होतोय. पण त्याआधी बिग बॉस ओटीटीच्या मंचावरचे स्पर्धकांचे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ समोर येत आहेत.

ठळक मुद्देझीशानच्या मते, बाथ्रोबमध्ये प्रवास करण्यात काहीही गैर नाही. ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही भूमिका मांडली होती.

काहीच तासांत बिग बॉस ओटीटीचा (Bigg Boss OTT) ग्रँड प्रीमिअर सुरू होतोय. पण त्याआधी बिग बॉस ओटीटीच्या मंचावरचे स्पर्धकांचे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ समोर येत आहेत. यावेळी बिग बॉसच्या घरात एकापेक्षा एक भारी स्पर्धक पाहायला मिळणार आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेता झीशान खान (Zeeshan Khan). ‘कुमकुम भाग्य’ या शोमुळे घराघरात पोहोचलेला  झीशान बिग बॉसच्या मंचावरही बाथ्रोबमुळे चर्चेत आहेत.होय, काही दिवसांपूर्वी हाच  झीशान गोवा एअरपोर्टवर बाथ्रोब घालून दिसला होता. बाथ्रोब घालून फ्लाईटमधून प्रवास करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आता बिग बॉसच्या प्रीमिअर नाईटलाही तो बाथ्रोब घालून पोहोचला. केवळ इतकेच नाही तर त्याच अवतारात होस्ट करण जोहरसमोर ( Karan Johar ) उभा झाला. याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

व्हिडीओत  झीशान बाथ्रोबमध्ये बिग बॉसच्या मंचावर एन्ट्री घेतो आणि त्याला पाहून करण जोहरही हैराण होतो. तू आतमध्येहीबाथ्रोबमध्येच जाणार का? तू रणवीर सिंग बनून आलास का? तुला तुझी बॉडी दाखवायचीय का? असे प्रश्न करण त्याला विचारतो आणि पुढे स्वत:च ‘जो दिखता है वही विकता है,’ असे   म्हणतो.

झीशानच्या मते, बाथ्रोबमध्ये प्रवास करण्यात काहीही गैर नाही. ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही भूमिका मांडली होती. आपल्याकडे एकच आयुष्य आहे आणि आपण त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे, असे माझे मत आहे. सार्वजनिक ठिकाणी बाथ्रोब घालणे अयोग्य आहे? हे कोणी ठरवले. मला यात काहीही चुकीचे वाटत नाही तर तुम्हाला का वाटायला हवे? मी बाथ्रोबमध्ये कम्फर्टेबल आहे तर तुम्हाला काय अडचण आहे? मी माझ्या अटींवर जगणारा माणूस आहे. कारण माझ्यासाठी एकच आयुष्य आहे आणि ते माझ्या पद्धतीने, माझ्या मताने उपभोगण्यासाठी मी इथे आहे,’ असे झीशान म्हणाला होता.

टॅग्स :बिग बॉसकरण जोहर