Join us
Daily Top 2Weekly Top 5

शर्ट उंदरानं कुरतडलाय का ? 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेदचा एअरपोर्ट व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 18:32 IST

बिग बॉस ओटीटीमध्येही उर्फी तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे चर्चेत राहिली होती. उर्फी या शो मधून बाहेर पडलेली पहिली स्पर्धक आहे. ओटीटी 'संडे के वार' च्या पहिल्या भागातच उर्फी जावेदला घरातन एक्झिट घ्यावी लागली होती.

'बिग बॉस ओटीटी' शोमध्ये उर्फी जावेद स्पर्धक म्हणून झळकली होती. उर्फी जावेद फार काही कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे फार कमी वेळात तिला घराबाहेर जावे लागले. शोमध्ये पहिली एलिमिनेट होणारी स्पर्धक उर्फी आहे. शोमधून बाहेर आल्यानंतर ती चर्चेत आहे. नुकताच तिचा एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

उर्फी एअरपोर्ट दिसताच मीडियाच्या कॅमऱ्यांनी तिला घेरले. यावेळी तिच्या ड्रेसिंग स्टाइलनेच साऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळत आहे.तिची ड्रेसिंग स्टाईलच सर्वांना आश्चर्यचकित करतेय. व्हिडिओ समोर येताच लोकांनी तिच्या स्टाईलबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. काहींनी तर तिला स्टायलिस्टकडून टीप्स घेण्याची गरज आहे, उंदराने शर्ट कुरतडला की काय असे म्हणत ट्रोल करायाला सुरुवात केली.

बिग बॉस ओटीटीमध्येही उर्फी तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे चर्चेत राहिली होती. उर्फी या शो मधून बाहेर पडलेली पहिली स्पर्धक आहे. ओटीटी 'संडे के वार' च्या पहिल्या भागातच उर्फी जावेदला घरातन एक्झिट घ्यावी लागली होती. पण काही चाहते उर्फीला शोमध्ये परत आणण्यात यावे अशी मागणी करत आहेत. यात  राखी सावंत देखील शोमध्ये उर्फीने परतावे अशी मागणी करताना दिसली होती.

शोचा स्पर्धक जीशान खानने उर्फी जावेदला सोडून दिव्या अग्रवालसोबत एक जोडी बनवली होती. यानंतर उर्फी डम्पिंग झोनमध्ये गेली.उर्फीला  स्वतःला सिद्ध करण्यासाठी  एक संधी देण्यात आली होती. 45 मिनिटांमध्ये तिला दिलेला टास्कमध्ये चांगली कामगिरी करुन दाखवायची होती. त्याचवेळी, उर्फीने अनवधानाने असे काही सांगितले की यामुळे मेकर्सना उर्फीला शोमधून बाहेर करावे लागले.