Join us

Bigg Boss OTT : पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी, घरात एन्ट्री करण्याआधीच नॉमिनेट झाली ही स्पर्धक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 10:29 IST

Bigg Boss OTT day 1 : देशातील सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ची काल दणक्यात सुरूवात झाली. टीव्हीवर टेलिकास्ट होण्याआधी 6 आठवडे हा शो ओटीटीवर दिसणार आहे.

ठळक मुद्देकाल प्रीमिअर डेला 13 स्पर्धकांनी घरात एन्ट्री घेतली आणि एन्ट्री घेताच पहिल्याच दिवशी दिव्या अग्रवाल नॉमिनेट झाली.

देशातील सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ची (Bigg Boss OTT ) काल दणक्यात सुरूवात झाली. टीव्हीवर टेलिकास्ट होण्याआधी 6 आठवडे हा शो ओटीटीवर दिसणार आहे. 6 आठवड्यांसाठी करण जोहर हा शो होस्ट करणार आहे. यानंतर शो टीव्हीवर शिफ्ट होईल आणि टीव्हीवर पुन्हा एकदा सलमान खान त्याच्या चिरपरिचित अंदाजात बिग बॉसच्या घराची सूत्र आपल्या हातात घेईल. काल प्रीमिअर डेला 13 स्पर्धकांनी घरात एन्ट्री घेतली आणि एन्ट्री घेताच पहिल्याच दिवशी दिव्या अग्रवाल नॉमिनेट झाली.

हे आहेत 13 स्पर्धकबिग बॉस ओटीटीमध्ये शमिता शेट्टी, उर्फी जावेद, प्रतिक सेहजपाल, करण नाथ, राकेश बापट, अक्षरा सिंह, रिद्धिमा पंडित, नेहा भसीन, मिलिंद गाबा, दिव्या अग्रवाल व झीशान खान, निशांत भट, दिव्य अग्रवाल या 13 स्पर्धकांनी धमाकेदार एन्ट्री घेतली.

पहिल्याच दिवशी वादाची ठिणगीप्रतिक सेहजपाल याने पहिल्याच दिवशी घरातील बॉईजशी पंगा घेतला. घरात एन्ट्री करताच त्याने अन्य स्पर्धकांना आव्हान दिले. अगदी स्टेजवरच प्रतिक झीशान खानसोबत भिडला. दोघेही एकमेकांवर कमेंट्स करू लागलेत. करणने दोघाांना शांत केले. प्रतिकचा तोरा पाहून करणनाथने त्याला सुनावले. कॉन्फिडन्स ठेव पण ओव्हर कॉन्फिडन्स बाळगू नकोस, असे त्याला बजावले. यावरून प्रतिक आणखीच बिथरला. मी कर्मा, तुफान, तबाही, गॉड आहे, असा दावा करू लागला. बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रतिक शांत बसणाºयांपैकी नाही, हे तेव्हाच स्पष्ट झालं.

पहिल्याच दिवशी गॉसिप्स

बिग बॉसच्या ओटीटीच्या घरात पहिल्याच दिवशी मुलींनी एका स्पर्धकाला टार्गेट केले. त्याच्याबद्दल चुगल्या सुरू झाल्यात. हा स्पर्धक अन्य कुणी नाही तर प्रतिक सेहजपाल आहे. प्रतिकनेही घरात येताच प्रत्येकाशी पंगा घेतला.

टॅग्स :बिग बॉसकरण जोहर