Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'च्या घरातच होणार ब्रेकिंग न्यूज, पत्रकाराची एन्ट्री; दारूच्या नशेत केलं होतं अँकरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 22:47 IST

Bigg Boss OTT 3 : यंदाच्या सीझनमध्ये पत्रकारही सहभागी होणार असल्याची चर्चा होती. आता या पत्रकाराने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस ओटीटी'चं दुसरं पर्व संपल्यापासूनच चाहते 'बिग बॉस ओटीटी ३'च्या प्रतिक्षेत होते. 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यंदाच्या सीझनमध्ये पत्रकारही सहभागी होणार असल्याची चर्चा होती. आता या पत्रकाराने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

पत्रकार दीपक चौरासिया 'बिग बॉस'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाले आहेत. न्यूजरूममधून दीपक चौरासिया यांनी थेट बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. एन्ट्री घेताच त्यांनी बिग बॉसच्या घरातील विशाल पांडे आणि लव्हकेश कटारिया यांची शाळा घेतली. आता बिग बॉसच्या घरात पत्रकाराने एन्ट्री घेतल्याने घरात पाहायला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

दीपक चौरासिया याआधी अनेक कारणांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी दारूच्या नशेत एका डिबेट शोमध्ये अँकरिंग केली होती. चुकीचं वाचल्यामुळे लगेचच त्यांचा शो ऑफ एअर करण्यात आला. त्यानंतर त्यांना नोकरीवरुनही काढण्यात आलं होतं. २००३ मध्ये त्यांनी डीडी न्यूजमधून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक वृत्त वाहिन्यांमध्ये काम केलं. पण, कॉन्ट्रोवर्सीमुळे ते जास्त चर्चेत होते. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार