Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss OTT 3 : मिका सिंगची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? कॉन्ट्रोव्हर्सी किंग अनिल कपूरचा शो गाजवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 14:00 IST

'बिग बॉस ओटीटी'मध्ये अनेक युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची नावं समोर आली आहेत. आता बॉलिवूड सिंगर मिका सिंगही  'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Bigg Boss OTT 3: 'बिग बॉस ओटीटी'चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस ओटीटी ३'ची घोषणा करण्यात आली. नव्या सीझनबरोबरच 'बिग बॉस ओटीटी'ला नवा होस्टही मिळाला आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी ३' सीझन होस्ट करणार आहेत. त्यामुळे या सीझनबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 'बिग बॉस ओटीटी'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबतही चर्चा रंगली आहे. 

'बिग बॉस ओटीटी'मध्ये अनेक युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची नावं समोर आली आहेत. आता बॉलिवूड सिंगर मिका सिंगही  'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार,  बिग बॉसच्या टीमकडून मिका सिंगला शोमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क केला आहे. त्यामुळे मिका सिंग यंदाच्या 'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. पण, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

'बिग बॉस ओटीटी'चा हा नवा सीझन येत्या २१ जूनपासून सुरू होणार आहे. जिओ सिनेमावर 'बिग बॉस ओटीटी ३' चाहत्यांना पाहता येणार आहे. या शोमध्ये युट्यूबर अरमान मलिक, अभि-नियू दिसणार असल्याचंही बोललं जात आहे. तर तनुश्री दत्ता, अहाना देओल, त्रिशला दत्त, तारक मेहता का उलटा चष्मा फेम भाव्या गांधी यांनाही शोसाठी विचारण्यात आलं आहे. 

टॅग्स :बिग बॉसमिका सिंगसेलिब्रिटी