Join us
Daily Top 2Weekly Top 5

चकवा देणार यंदाचा खेळ! 'बिग बॉस मराठी ६'चा नवा प्रोमो समोर, रितेशभाऊंनी दिली थीमची हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:07 IST

'बिग बॉस मराठी ६'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये भाऊचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. याशिवाय रितेश देशमुखने यंदाची थीम काय असणार याबाबत थोडी हिंटही प्रोमोमधून दिली आहे. 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस हिंदी'नंतर आता 'बिग बॉस मराठी' कधी सुरू होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. यंदाची थीम काय असणार, कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे. 'बिग बॉस मराठी ६'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये भाऊचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. याशिवाय रितेश देशमुखने यंदाची थीम काय असणार याबाबत थोडी हिंटही प्रोमोमधून दिली आहे. 

“फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा कडक शब्दांत रितेश भाऊंनी या सीझनचा बार उडवला आहे. पुढे तो म्हणतो, "याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ... शेकडो दारं खिडक्यांनी सजलाय घराचा जंगी थाट... दारापलिकडचं सरप्राइज ठरवेल प्रत्येकाची वाट... तेव्हा घट्ट करा मन थंड ठेवा मस्तक, ऐका दारावरची दस्तक...दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार". 

या नव्या प्रोमोवरुन असं लक्षात येतं की यंदाची थीम आणि खेळ हा स्पर्धकांना चकवा देणारा असणार आहे. प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतो. त्यामुळे स्पर्धकांना सावध राहून अगदी हुशारीने खेळ खेळावा लागणार आहे. यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सदस्यांचे नशिब बदलणारा असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

'बिग बॉस मराठी'चं हे नवं पर्व नववर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ११ जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी ६' सुरू होणार आहे. यंदा शोच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता 'बिग बॉस मराठी ६' प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी ६रितेश देशमुखटिव्ही कलाकार