Join us
Daily Top 2Weekly Top 5

उघडणार एलिमिनेशनचं दार! पहिल्याच आठवड्यात कोण जाणार 'बिग बॉस'च्या घराबाहेर? प्रोमो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:40 IST

'बिग बॉस'च्या घरातील पहिलं नॉमिनेशन! 'या' सदस्यांवर टांगती तलवार, कोण घेणार घराचा निरोप?

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व सुरु होऊन नुकताच आठवड्याभराचा कालावधी उलटला आहे. त्यानंतर आता या स्पर्धेची काठीण्य पातळी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. एक घर, १०० दिवस आणि १७ स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे.आता या आठवड्यात भाऊचा धक्का देखील चांगलाच रंगला.रितेश देशमुखने पहिल्याच आठवड्यात  घरातील काही कलाकारांची चांगलीच शाळा घेतली. तर काहींचं कौतुकही केलं.आता म्हणायला गेलं तर बिग बॉसच्या घरात खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अशातच या आठवड्याचं पहिलं नॉमिनेशन पार पडणार आहे. 

‘बिग बॉस मराठी’ आणि टास्क हे एक समीकरणच आहे. स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावेच लागतात. प्रीमियरपासूनच ‘बिग बॉस’ स्पर्धकांना पेचात पाडत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची सर्वत्र चर्चा होत असून घरातील सदस्यांचं भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरू होऊन ,सात दिवस पूर्ण झाले असून  पहिल्याच आठवड्यात घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

मागच्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात एविक्शन झालं होतं.  त्यामुळे आता या सीझनच्या पहिल्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. अलिकडेच बिग बॉसच्या घरात पतंग कापण्याच्या टास्कमध्ये एकूण ९ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. दिपाली सय्यद, करण सोनावणे, रुचिता जामदार तसेच प्रभू शेळके , अनुश्री माने, सागर कारंडे, रोशन भजनकर, दिव्या शिंदे, राधा पाटील या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.याबाबतचा प्रोमो देखील प्रेक्षकांसमोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यात आठवड्यात  दिव्या शिंदेला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. तर रोशन आणि प्रभू शेळके देखील सेफ झोनमध्ये असल्याचं कळतंय.त्यामुळे सर्वात कमी  मतं मिळालेला सदस्य बिग बॉसच्या घराला रामराम करणार एवढं मात्र नक्की. 

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार? याची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Elimination Door Opens! Who exits 'Bigg Boss' house first week?

Web Summary : Bigg Boss Marathi 6 sees its first nomination. Nine contestants face eviction after a kite-cutting task. Divya Shinde leads in votes, while the least popular will leave the house. Official details are awaited.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनसेलिब्रिटी