Join us
Daily Top 2Weekly Top 5

राकेश बापट पैशांची बॅग घेऊन घराबाहेर जाणार? 'बिग बॉस मराठी ६' फायनलआधी प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:44 IST

राकेश टॉप ५ मधून एलिमिनेट होणार का? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

'बिग बॉस मराठी सीझन ६'चा ग्रँड फिनाले आज रंगणार आहे. या सीझनचा विजेता किंवा विजेती कोण होणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राकेश बापट, तन्वी कोलते, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि दीपाली सय्यद हे पाच सदस्य टॉप ५ पर्यंत पोहोचले आहेत. विजेता घोषित करण्याआधी दर सीझनला सदस्यांना पैशांची बॅग घेऊन विजेपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची संधी मिळते. यावेळी कोणता सदस्य पैशांची बॅग घेऊन जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये राकेश बापट पुढे येताना दाखवलं आहे. याचा अर्थ राकेश टॉप ५ मधून एलिमिनेट होणार का? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

बिग बॉस मराठी ६ च्या आजच्या ग्रँड फिनाले अवघे काही तास राहिले आहेत. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख सदस्यांना प्राईज मनीविषयी सांगत आहे. रितेश म्हणतो,'आता ग्रँड फिनालेचं पहिलं एव्हिक्शन होणार आहे. जो सदस्य बझर वाजवून स्वत:ला एलिमिनेट करेल त्याला मी ५ लाख रुपये ऑफर करतोय. शेवटी राकेश बझरच्या दिशेने येताना दिसतो आणि सगळ्यांच्या बाहेर बसलेल्या सर्वच सदस्य शॉक होतात.' आता राकेश खरंच बझर वाजवून एलिमिनेट होतो का हे आजच्या फिनालेलाच कळेल.

बिग बॉस सीझन ६ चा ग्रँड फिनाले आज रात्री ८ वाजता होणार आहे. प्रोमोच्या कमेंट्समध्ये सगळे 'अनुश्री विजेती झालीये','तन्वीच जिंकणार' असं म्हणत आहेत. तर काहींनी 'दीपालीने बॅग घेतली असणार राकेशने नाही' अशाही कमेंट्स केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rakesh Bapat to leave 'Bigg Boss' with money bag?

Web Summary : The 'Bigg Boss Marathi 6' finale airs today. A promo shows Rakesh Bapat approaching a buzzer to potentially exit with prize money. Speculation surrounds whether he'll take the offer or compete for the win. The grand finale airs tonight.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६राकेश बापटकलर्स मराठीरितेश देशमुख