Join us

महाचक्रव्यूह! Bigg Boss ने आणला सर्व टास्कचा महाबाप, स्पर्धकही शॉक; प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:08 IST

Bigg Boss Marathi season 5 Contestants: बिग बॉसचा महाचक्रव्यूह काय आहे?

Bigg Boss Marathi season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या फायनलला अवघे १२ दिवसच राहिले आहेत. यंदा शो १०० नव्हे तर ७० दिवसातच निरोप घेतोय. सध्या घरात एकूण आठ स्पर्धक राहिले आहेत. तसंच आठही स्पर्धकांना बिग बॉसने नॉमिनेट केलं आहे. त्यातच आता बिग बॉसने त्यांचा महाचक्रव्यूह आणला आहे. तो पाहून स्पर्धकांच्या तोडचं पाणी पळालं आहे. काय आहे हा महाचक्रव्यूह बघा.

कलर्स मराठीने प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये बिग बॉस म्हणतात, "बिग बॉस मराठीच्या या सीझनच्या विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम आहे २५ लाख रुपये. ही प्राईज मनी कमवण्यासाठी मी आणलाय सर्व टास्कचा बाप, महाचक्रव्यूह."  हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रोमोमधून हे स्पष्ट दिसतंय की बिग बॉस स्पर्धकांना महाचक्रव्यूहात अडकवणार आहेत. हे पाहून स्पर्धकही शॉक झालेले दिसत आहे. या टास्कमध्ये नक्की काय होणार हे पाहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे.

६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस सीझन ५ चा ग्रँड फिनाले होणार आहे. सध्या घरात वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे आठ स्पर्धक राहिले आहेत. यांच्यातील कोण बाहेर जाणार आणि कोण ट्रॉफी जिंकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीसोशल मीडियाकलर्स मराठी