Join us

नव्या नवरीचा पहिला ओवसा...! 'असं' पार पडलं अंकिताचं पहिलं गौरी पूजन, व्हिडीओवर होतोय प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:25 IST

लग्नानंतरचा पहिला सण, नवीन घरातलं पहिलं गौरी पूजन! अंकिता वालावलकरने शेअर केला सुंदर व्हिडीओ 

Ankita Walawalkar Video: सध्या सर्वत्र सगळीकडेच गणपती बाप्पाचं आगमन झाल्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे. अनेक कलाकारांकडे गणपती बाप्पाची स्थापना केली जाते.मोठ्या आनंदाने आणि भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून,  महाराष्ट्रातील प्रत्येक भागात गौरीच मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं. यात कलाकारही मागे नाहीत. 'आली गौराई अंगणी, तिचे लिंबलोण करा,' असे म्हणत सगळे तिच्या सेवेत गुंतले आहेत.अशातच सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

दरम्यान,गौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे ओवसा. कोकणात खास करून ही परंपरा आजही जपली जाते. नववधूसाठी पहिला ओवसा फार महत्त्वाचा असतो. सुवासिनी गौरीला ओवसायला येतात. अंकिताचा देखील लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव असून आता ती गौरीपूजनासाठी कोकणात पोहोचली आहे. कोकणातील याचा सुंदर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.“माझं पहिलं गौरी पूजन”  खूप खास क्षण ..लग्नानंतरचा पहिला सण, नवीन घरातलं पहिलं पूजन, आणि सगळ्यांच्या आशीर्वादातली सुंदर आठवण...". असं सुंदर कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला देत तिच्या भावना व्यक्त केला आहेत. 

या व्हिडीओमध्ये तिच्या घरच्या गौराई देखील पारंपरिक रुपात पाहायला मिळाल्या.त्यांना नेसवलेली साडी, हार, सजावट याचीही झलक यामधून दिसत आहे.अंकिताने अगदी पारंपरिक पद्धतीने पहिलं गौरी पूजन केलं आहे.डोक्यावर सूप घेऊन अंकिता ओवसा घेऊन चालल्याचं दिसतंय. तसेच तिच्या सोबतीला पती कुणाल आणि सासूबाई देखील पाहायला मिळताय. कोकण हार्टेड गर्ल या व्हिडीओमध्ये पारंपरिक लूकमध्ये दिसते. सध्या सोशल मीडियावर अंकिताचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचं भरभरुन कौतुक केलं आहे. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरगणेश चतुर्थीसेलिब्रिटीसोशल मीडिया