Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 11:34 IST

"तुम्ही जिथेपण असाल...",'बिग बॉस मराठी' फेम सोनाली पाटीलच्या आजोबांचं निधन, शेअर केली भावूक पोस्ट

Sonali Patil Grandfather Passed Away: मनोरंजन विश्वातून एक दु खद बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस मराठी-३'फेम अभिनेत्री सोनाली पाटीलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनालीच्या आजोबांचं वृद्धपकाळाने निधन झालं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन याबाबत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे.सोनालीने इन्स्टाग्रामवरुन आजोबांबरोबरचे काही भावुक क्षण शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या आजोबांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.

सोनाली पाटीलने तिच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने म्हटलंय," आजोबा(बापू) तुमच्याकडे येणारी आमची पावलं आता थांबलीत.रिकामा वाडा,तुमच्या पैलवानकीच्या गप्पा,दुनियादारी,शिक्षणाचे महत्त्व, स्वतः शाळेत न जाता सुद्धा शिक्षणाची ओढ आणि मुलींनी शड्डू मारलच पाहिजे,म्हशीच्या पहिल्या धारेच्या दुधाची सवय, पितळेच्या डब्यातले काजू,बदाम आणि वस्त्रगाळाची थंडाई, अजून किती आणि काय सांगू ... तुम्ही जिथेपन असाल,तुमचं आमच्याकडेच लक्ष आहे. ओम शांती... अशी डोळे पाणावणारी पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. सोनालीची ही पोस्ट पाहून इंडस्ट्रीतील कलाकारांनीही तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. सोनाली आणि तिच्या आजोबांचं नातं फार खास होतं. त्यांच्या निधनानंतर सोनालीसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

अभिनेत्री सोनाली पाटीलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'वैजू नंबर वन', 'घाडगे अँड सून',' देवमाणूस' या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अलिकडेच ती कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत काम करताना पाहायला मिळाली.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Bigg Boss Marathi' Fame Actress Mourns the Loss of Her Grandfather

Web Summary : Sonali Patil, famed for 'Bigg Boss Marathi-3', is grieving her grandfather's death due to old age. She shared emotional memories on social media, prompting condolences from the Marathi entertainment industry. Patil's notable works include 'Vaiju Number One' and 'Devmanus'.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया