Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 12:18 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले आरोप – प्रत्यारोप हे कार्य रंगले. घरातील सदस्यांवर कधी महेश मांजरेकरांनी, कधी सदस्यांनी तर कधी प्रेक्षकांनी बरेच आरोप लावले.

ठळक मुद्देआज बिग बॉस मराठीच्या घरामधील सदस्य उत्तरं देणार आहेत पत्रकारांच्या प्रश्नांची

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले आरोप – प्रत्यारोप हे कार्य रंगले. घरातील सदस्यांवर कधी महेश मांजरेकरांनी, कधी सदस्यांनी तर कधी प्रेक्षकांनी बरेच आरोप लावले. पण, बिग बॉस यांनी काल सदस्यांना त्यांच्यावरचे आरोप खरे आहेत कि खोटे हे इतर सदस्यांना आणि प्रेक्षकांना पटवून देण्याची संधी दिली. टिकीट टू फिनाले हे मिळविल्यानंतर फाईनलिस्ट पुष्कर या कार्यामध्ये न्यायाधीश आणि आस्ताद आरोपी विरोधाचा वकील बनला. ज्यामध्ये मेघावर बरेच आरोप केले गेले. ज्यामुळे मेघा, पुष्कर आणि सई मध्ये बरेच वाद झाले. कार्यानंतर बिग बॉस यांनी फाईनलिस्टची नावं घोषित केली. ज्यामध्ये सईचे नाव न घेतल्याने पुष्कर, मेघा आणि सईला खूप मोठा धक्का बसला. परंतु थोड्यावेळातच बिग बॉस यांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये सहा फाईनलिस्ट असतील असे घोषित केले आणि सगळ्यांनीच घरामध्ये त्यांना झालेला आनंद व्यक्त केला. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार पत्रकार परिषद. ज्यामध्ये सदस्य देणार पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे. 

आज बिग बॉस मराठीच्या घरामधील सदस्य उत्तरं देणार आहेत पत्रकारांच्या प्रश्नांची. ज्यामध्ये मेघा, आस्ताद, शर्मिष्ठा, सई, पुष्कर आणि स्मिता यांना बरेच प्रश्न विचारले जाणार आहेत. ज्याची उत्तर सदस्यांना द्यायची आहेत. या पत्रकार परिषदाची सांगता आस्ताद काळे त्याच्या गाण्याने करणार आहे. घरातील सदस्यांना पत्रकारांना त्यांच्यासमोर बघून खूपच आनंद होणार आहे. प्रेक्षकांना आज कळणार कोण आहे फेक ? कोण आहे रिअल ? घरातून बाहेर पडल्यावर सदस्यांना कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ? कोणाला भेटायचे आहे ? मेघा का बोलली खोट ? त्यामुळे आजचा भाग बघणे नक्कीच रंजक असणार आहे.