Join us  

सोनालीला वाटते घरातील 'या' स्पर्धकाची भीती?; मीनलजवळ केलं मन मोकळं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 7:13 PM

Bigg boss marathi: 'बिग बॉस'च्या घरात सोनाली आणि मिनल यांच्यात चर्चा होताना दिसणार आहे. यावेळी त्या घरात रंगत असलेल्या टास्कबद्दल बोलत आहेत.

 बिग बॉस मराठीचं तिसरं (bigg boss marathi 3) पर्व आता मध्यावर येऊन पोहचलं आहे. या घरात सेलिब्रिटी स्पर्धकांनी प्रवेश करुन आता ५० दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. त्यामुळे सुरुवातीला ग्रुप करुन राहणारे स्पर्धक आता स्वतंत्र खेळू लागले आहेत. यामध्येच काही स्पर्धक स्ट्रॅटजी प्लॅन आखत आहेत. सध्या या घरात 'जपून  दांडा धर' या टास्कमध्ये हे स्पर्धक स्ट्रॅटर्जी प्लॅन आखत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे घरात दरवेळी अरेरावीपणे वावरणाऱ्या जयची आता सोनालीला भीती वाटत असल्याचं तिच्या वक्तव्यावरुन वाटत आहे. त्यामुळे सोनालीने केलं या वक्तव्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

'बिग बॉस'च्या घरात सोनाली आणि मिनल यांच्यात चर्चा होताना दिसणार आहे. यावेळी त्या घरात रंगत असलेल्या टास्कबद्दल बोलत आहेत. “हा म्हणत होता की मला कॅप्टन नाही व्हायचं आहे, कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की मुला मुलांमध्ये जे काही होईल... पण कुठेतरी त्याने टेन्शन घेतला आहे, असं सोनाली जयविषयी मीनलला सांगते. त्यावर, प्रॉब्लेम कुठे होतो जिथे जय, उत्कर्ष,विशाल आणि विकास एकत्र येतात. त्यावेळी ते म्हणणार की आपण एकत्र खेळूया. पण शेवटी ते दोघे या दोघांवर गेम करतात, असं मीनल म्हणाली.

मीराच्या संयमाचा फुटला बांध; जेलच्या दरवाजावर आपटलं स्वत:चं डोकं? 

“मी विशालला सांगितले समजा तू, जय आणि उत्कर्ष असे तिघेच राहिलात तर एका पोलवर तू आणि जय पडू नका. कारण मग जय उंची वापरुन किंवा अजून काहीतरी वापरुन स्ट्रॅटजी करणार. आणि मग, सहाजिकच उत्कर्ष त्याच्या पोलवर जाणार. त्यामुळे मग हे दोघंही नाही रहाणार.

दरम्यान, सोनालीच्या बोलण्यावरुन जय ज्या पद्धतीने टास्क खेळतो ते पाहून तिला भीती वाटत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेकदा जयने युक्तीपेक्षा शक्तीचा वापर केला आहे. त्यामुळे त्याच्या याच गोष्टीमुळे अनेकदा घरात वादही झाले आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार