Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बार डान्सरमुळे लावणीची वाट लागली", दिपाली सय्यदच्या वक्तव्यावर हिंदवी पाटील स्पष्टच बोलली, म्हणाली- "त्यांना या गोष्टी टोचणं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:37 IST

"स्टेजवर डान्स करणाऱ्या बार डान्सरमुळे लावणीची वाट लागली", असं दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या. दिपाली यांचं हे वक्तव्य राधाला पटलं नव्हतं. दिपाली सय्यद यांच्या या वक्तव्यावर आता लावणी डान्सर हिंदवी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिपाली सय्यद यांनी लावणीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राधा पाटील दुखावली होती. "स्टेजवर डान्स करणाऱ्या बार डान्सरमुळे लावणीची वाट लागली", असं दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या. दिपाली यांचं हे वक्तव्य राधाला पटलं नव्हतं. त्याबद्दल तिने तन्वीशी नाराजी व्यक्त केली होती. दिपाली सय्यद यांच्या या वक्तव्यावर आता लावणी डान्सर हिंदवी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. 

"दिपाली सय्यद ज्या म्हणाल्या त्या अगदी बरोबर आहे. त्या चुकीच्या म्हणाल्या असं मी बोलणार नाही. कारण त्या सिनियर आहेत. त्यांनी खूप गोष्टी लावणीबाबत बघितल्या आहेत आणि स्वत: त्यांनी लावणी परफॉर्म केलेली आहे. त्यांना या गोष्टी टोचणं हे स्वाभाविक आहे. आजकालची स्टेजवरची ड्रेसिंग सेन्स ही बिघडली आहे. त्यामुळे त्या गोष्टी पाहताना वाटतातच. मग ते कुठलंही गाणं असो. आजकाल कुठलीही मुलगी असू दे तिला स्टेजवर त्याच पद्धतीने परफॉर्म करायचं आहे. ज्या आधी करत होत्या, त्यांनी हे सगळं सोडलं आहे. मग तुम्ही त्यांना कॉपी करून फेमस व्हायचा प्रयत्न का करताय. त्यांना आपल्या चुका कळल्यानंतर त्यांनी या गोष्टी सोडल्या. मग तुम्ही त्यांना का फॉलो करताय... तुम्ही त्यांच्यासारखं करताय म्हणून आज त्यांनाच नावं ठेवली जात आहेत. तुमच्यात जे टॅलेंट आहे ते तुम्ही स्टेजवर दाखवा", असं हिंदवी पाटील राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

हिंदवीने राधा पाटीललाही सल्ला दिला. ती म्हणाली, "जर तू डिजेवर परफॉर्म करतेस...लावणी करताना ती व्यवस्थित करतेस तर या गोष्टी तुला लागू देऊ नकोस. तुला जर कोणी समोरून येऊन बोललं की तू तसं करतेस तर मग त्यांना उत्तर दे. पण, जर दिपाली ताई बोलत असतील तर त्यांना उलट उत्तर देऊ नकोस. प्रेक्षक सगळं पाहत आहेत. त्यामुळे त्यांना सगळं माहीत आहे. पण तू कुणाचाही अपमान करू नकोस". 

English
हिंदी सारांश
Web Title : Lavani's decline blamed on bar dancers: Hindavi Patil responds.

Web Summary : Hindavi Patil supports Deepali Sayyad's view that bar dancers negatively impact Lavani. She criticizes stage dressing and urges originality, advising Radha Patil to ignore irrelevant criticism and focus on her talent.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार